Breaking
Updated: मार्च 4, 2026
किरकोळ वादातून मेहुण्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशिरूर कासार: तालुक्यातील मातोरी येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका व्यक्तीने आपल्या मेहुण्यावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना १ मार्चच्या रात्री घडली. फिर्यादी प्रतीक्षा कैलास झांबरे या आपल्या पतीसह बहिणीकडे होळी सणानिमित्त आल्या होत्या. रात्री झोपेत असताना आरोपी नारायण साहेबराव ढवळे याने पूर्ववैमनस्यातून कैलास झांबरे यांच्या गळ्यावर, छातीवर आणि हातावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आरडाओरडा झाल्याने घरातील इतर लोक जागे झाले, तोपर्यंत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पानपाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.