Breaking
Updated: जानेवारी 30, 2026
हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून तलवारीने हल्ला; परिसरात खळबळ
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: कारचा हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून एका गटाने फिर्यादीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना झमझम कॉलनी परिसरात घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
मोहम्मद इकराम खान अब्दुल समद खान (वय ५२, रा. झमझम कॉलनी) यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २७ जानेवारी रोजी रात्री फिर्यादी आपल्या कारमधून जात असताना रस्त्यात मोटारसायकल उभी असल्याने त्यांनी हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने आरोपी शेख आदिल शेख रोनक, शेख आखिल शेख रोनक आणि मोहम्मद हनीफ यांच्यासह त्यांच्या नातेवाईक महिलांनी घराबाहेर येऊन फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शेख आदिल याने हातातील तलवारीने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या मानेवर वार केला, जो वार त्यांच्या ओठाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
बीड शहर पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बल्लाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.