Breaking
Updated: जानेवारी 30, 2026
भरदिवसा महिलेचे गंठण लांबविले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel८५ हजारांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
नेकनूर – मांजरसुंबा बस स्थानकातून एका महिलेच्या गळ्यातील मिनीगंठण अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार (दि.११) रोजी घडली असून एकूण ८५,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून शिलाताई शिवाजी चव्हाण (वय ६०) रा.बीड ह्या मोरगाव येथे दर्शनासाठी जात असताना मांजरसुंबा बस स्थानकात त्या थांबल्या असता तेथून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे मिनीगंठण लंपास केल्याची घटना रविवार (दि.११) रोजी भरदिवसा १०:३० च्या सुमारास घडली असून असा एकूण ८५,००० हजारांचा ऐवज लंपास केल्या प्रकणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिलाताई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुरुवार (दि.२९) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री.राऊत हे करत आहेत.