Breaking

भरधाव कारच्या धडकेत सात मेंढ्यांचा जागीच मृत्यू; पूस-परळी रस्त्यावरील दुर्घटना

Updated: जानेवारी 13, 2026

By Vivek Sindhu

पूस-परळी रस्त्यावरील दुर्घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: तालुक्यातील पूस ते परळी रस्त्यावर एका भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशझोतामुळे कार चालकाला रस्ता न दिसल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मेंढपाळ खंडू गायके हे दिवसभर आपल्या मेंढ्या चारून सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत होते. पूस-परळी रोडवर पद्मावती देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ ते आले असताना, परळीकडून लातूरच्या दिशेने एक कार अत्यंत वेगाने येत होती. याच वेळी समोरून येणाऱ्या एका दुसऱ्या वाहनाचा तीव्र प्रकाश कार चालकाच्या डोळ्यांवर पडला. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट मेंढ्यांच्या कळपात शिरली. या जोरदार धडकेत सात मेंढ्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा सविस्तर पंचनामा केला आहे. या अपघातात मेंढपाळ खंडू गायके यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बर्दापूर पोलिसांनी संबंधित कार चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कार पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे.


Categories

Recent Posts