Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
स्कॉर्पिओच्या धडकेत ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: रस्ते सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून उसाची ट्रॉली उभी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महादेव रामा भुताडमल (वय ५५ वर्षे, रा. पाडळसिंगी, ता. गेवराई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा पवन महादेव भुताडमल हा ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री ११:३० वाजता दुचाकीवरून घराकडे जात होता. निपाणी टाकळी ते जय महेश साखर कारखाना रस्त्यावर ऊस भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४४ ए ई ०२२४ आणि त्यास जोडलेल्या दोन ट्रॉल्या विना रेडियम आणि धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभ्या होत्या.
अंधारात ट्रॉलीला कोणतेही परावर्तक नसल्याने पवनच्या दुचाकीची ट्रॉलीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याने पवनचा मृत्यू झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाने रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन उभे करून तेथून निघून गेल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी ७ जानेवारी रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.