Breaking

अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर भीषण अपघात; खाजगी ट्रॅव्हल्सच्या धडकेत इनोव्हा चालक गंभीर जखमी

Updated: जानेवारी 1, 2026

By Vivek Sindhu

स्कॉर्पिओच्या धडकेत ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी): – अंबाजोगाई ते लातूर मार्गावरील सायगाव शिवारात बुधवारी(दि. 31 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारला जोराची धडक दिली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अंबाजोगाई-लातूर सिमेंट रोडवर विश्वंभर तुकाराम मस्के यांच्या शेतातील घरासमोर हा अपघात झाला. ट्रॅव्हल्स क्रमांक (MH 09 EL 4527) चा चालक मच्छिंद्र हैबती भोसले (रा. नवी मुंबई/लातूर) हा आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवत होता. एका ऊसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने समोरून येणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारला (क्रमांक MH 08 AX 0519) भीषण धडक दिली. यात इनोव्हा चालक श्रीकांत रामकिशन तांदळे हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी फिर्यादी कृष्णा बालाजी होळंबे (वय २२, रा. होळंब ता. परळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅव्हल्स चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी श्रीकांत तांदळे (रा. कोरेगाव, ता. केज) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.


Categories

Recent Posts