Breaking
Updated: डिसेंबर 30, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड -शहरापासून जवळच असलेल्या वासनवाडी शिवारात सराईत गुन्हेगार भिमा मस्केच्या टोळीसह वडवणी येथील एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करत घरफोडीचेही चार गुन्हे उघड केले असून सहा जणांना सापळा रचून ताब्यात घेत ३ लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बीड शहरातून भिमा लक्ष्मण मस्के (वय ३९) रा. बलभिम नगर, वतारवेस, बीड, विजय वसंत तायड (वय २५) रा.माऊली नगर, बीड आणि हुसेन बशीर शेख (वय ४५) रा. पावरहाऊस जवळ, माऊली नगर, बीड या तिघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून चोरी केलेली ५०० किलो अॅल्युमिनियम तार जप्त करून आरोपींना बीड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.