Breaking

फुकटात वडापाव खाल्ला, पैसे मागताच दुकानदारावर चाकूने हल्ला

Updated: डिसेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

लोखंडी रॉडने केले जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: फुकटात वडापाव खाल्ल्यानंतर दुकानदाराने पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने दुकानदाराला मारहाण करत चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील बार्शी नाका येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पेठ बीड पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बार्शी नाका येथे जफर खान मुसा खान (३८, रा. महंमदिया कॉलनी) यांच्या वडापावच्या गाड्यावर आरोपी आले. सखाराम छगन वाघमारे, बाबा खाजा शेख, हुबेरा खाजा शेख आणि राणी सखाराम वाघमारे (सर्व रा. गांधीनगर, पेठ बीड) यांनी वडापाव खाल्ले. जफर खान यांनी पैशांची मागणी केली असता, “आम्हाला एवढे पंडित कोणी पैसे मागितले नाहीत,” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. वादावादी दरम्यान आरोपी सखाराम वाघमारे याने आपल्या जवळील चाकूने जफर खान यांच्या पाठीवर वार केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी जफर खान यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार ठोंबरे करीत आहेत.


Categories

Recent Posts