Breaking

लिंबाचीवाडी साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी ८४ लाखांचा निधी

Updated: डिसेंबर 13, 2025

By Vivek Sindhu

आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे तांत्रिक अडचणीवर यशस्वी तोडगा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आमदार नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा यशस्वी; कार्यारंभ आदेशही निघाले

​अंबाजोगाई : तालुक्यातील लिंबाचीवाडी येथील साठवण तलाव क्र. १ च्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे. केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामासाठी शासनाकडून तब्बल ८४ लाख २१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, संबंधित विभागाकडून कामाचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देखील देण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लिंबाचीवाडी येथील साठवण तलाव क्र. १ ची तातडीने दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे होते. या तलावाच्या दुरुस्तीमुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आ. नमिता मुंदडा यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

​त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, माजलगाव पाटबंधारे विभागाने ११ डिसेंबर २०२५ रोजी या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. या कामासाठी एकूण ८४ लाख २१ हजार ४७० रुपये एवढ्या रकमेची निविदा मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री (गोदावरी खोरे) राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

हे काम पूर्ण झाल्यास पावसाळ्यातील पाणी साठवणुकीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.​आमदार नमिता मुंदडा यांच्या या तत्परतेमुळे लिंबाचीवाडी आणि परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


Categories

Recent Posts