Breaking
Updated: डिसेंबर 10, 2025
केज परिसरात आढळल्यास पोलिसांना कळवावे : पोनि स्वप्निल उणवने
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज परिसरात आढळल्यास पोलिसांना कळवावे : पोनि स्वप्निल उणवने
केज – केज शहरात सध्या सराईत गुन्हेगाराची टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली आहे. ही टोळी लग्नसमारंभ, बाजारपेठा आणि विशेषतः बँक परिसराबाहेर थांबून नागरिकांचे खिसे कापणे (पिक पॉकेटिंग) व रोकड चोरी करीत आहे. अशा व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवने यांनी केले आहे.
बादल कृष्णा सिसोदिया (वय अंदाजे १८, रा. जाठखेडी), जास्वंत मनिलाल सिसोदिया (रा. कडिया, जि. रायगड) या आरोपींचा संबंध एमपी ०४, एमपी ०९, एमओ ३९ या क्रमांकांशी असलेल्या गुन्हेगारी कृत्यांशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आरोपी प्रामुख्याने लग्नाच्या समारंभात गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे खिसे कापतात. तसेच, ते बँकेच्या बाहेर थांबून बँकिंग व्यवहार करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवतात आणि संधी मिळताच त्यांची बॅग अथवा रोकड घेऊन पळून जातात. केज परिसरात या टोळीतील तीन मुख्य आरोपींची नावे आणि तपशील पोलिसांकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांनी लग्नसमारंभ व बँक व्यवहार करताना विशेषतः सावधानता बाळगावी. जर या वर्णनाचे अथवा संशयास्पद हालचाली असलेले व्यक्ती शहरात किंवा परिसरात आढळल्यास नागरिकांनी त्वरित केज पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून माहिती कळवावी. नागरिकांच्या सतर्कतेने या गुन्हेगारांना पकडणे शक्य होईल. शहरात शांतता व सुरक्षितता टिकेल, असे आवाहन पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले आहे.