Breaking
Updated: डिसेंबर 10, 2025
सर्वज्ञ दासोपंत, नृसिंह सरस्वती वेद पाठशाळेचा वर्धापन दिन उत्साहात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – सर्वज्ञ दासोपंत,नृसिंह सरस्वती गुरूकुल वेद पाठशाळेचा तिसरा वर्धापन दिन रविवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी वेदांत साधना मंडळाचे स्वामी भारतानंद गिरी, राम मंदीरचे मुख्य अर्चक गदाधर बुवा रामदासी, मुकूंदराज संस्थानचे अध्यक्ष किसन महाराज पवार, लातुर येथील भागवताचार्य अच्युत पाठक,इतिहासकार डॉ.शरद हेबाळकर,वेद पाठशाळेचे अध्यक्ष शेखर श्रीनिवासन, प्रा.डॉ.दिगंबर मुडेगांवकर आदी उपस्थित होते पाहुण्यांनी सांगितले की वेद वाड्मयावर आधारलेली संस्कृती हीच प्राचीन होय त्याची पुनरावृत्ती होणे काळाची गरज असून वेदपाठशाळेच्या माध्यमातून ते उद्दीष्ट पुर्ततेकडे जात आहे. वेद पाठशाळा ही शहराच्या अध्यात्मिक संस्कृतीला चालना देणारी असून ती अनादी काळा पर्यंत ही संस्कृती जतन करण्याचे काम करावे लागेल.
शेखर श्रीनिवास यांनी सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीचे जगात अजिंक्यत्व असून या संस्कृतीला विदेशात देखील गौराविल्या जात आहे.भारतीय अध्यात्माचे शिक्षण घेत असलेले पाठशाळेतील विद्यार्थी पुढील काळात वेदाभ्यासात पारंगत होतील असा विश्वास व्यक्त केला
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार करून उद्घोष केला
पाठशाळेचे प्रमुख नवनाथ जोशी(घनपाठी) यांनी वेदपाठशाळेतील उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी पाठशाळेतील विद्यार्थी, परिसरातील महिला,नागरीक उपास्थित होते.