Breaking

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो – राजकिशोर मोदी

Updated: डिसेंबर 8, 2025

By Vivek Sindhu

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील महामानव यांच्या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या चौकास अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी अभिवादन केले

राजकिशोर मोदी यांनी विश्व वंदनीय डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की, समता आणि माणसांच्या सन्मानासाठी डॉ.बाबासाहेबांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, सामाजिक कार्यातून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेसाठी आम्ही व आमचे सर्व सहकारी काम करीत आहोत, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो. भारताची सार्वभौम राज्यघटना डॉ.बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली. या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने चालतो. या महामानवाला संपूर्ण जगभरात अभिवादन करण्यात येते. संपूर्ण राज्यभरातून आणि देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर एकत्रित येतात. अनुयायी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्रंथ खरेदी करतात. ही विशेष नोंद घ्यावी अशी बाब आहे. नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम हे ग्रंथ करतात. असे सांगून भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोदी यांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. ते पुढे म्हणाले की, आम्ही व आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करतो. त्यांचे दूरदर्शी विचार, न्याय आणि समानतेसाठी अढळ वचनबद्धता या संवैधानिक मूल्यांनी भारताच्या विकास प्रवासाला आकार दिला आहे. डॉ.आंबेडकरांनी नेहमीच भावी पिढ्यांना मानवी प्रतिष्ठा आणि लोकशाही आदर्शांना बळकट करण्यासाठी प्रेरित केले आहे. संविधान सर्वांत श्रेष्ठ आहे. संविधानानुसार आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. विकसित भारताच्या उभारणीत बाबासाहेबांचे विचार आपला मार्ग उजळवत राहावेत. असा आशावाद राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी लोक विकास महाआघाडीतील सहभागी घटक पक्षाचे नेते डॉ.नरेंद्र काळे, महेंद्र निकाळजे, सुनिल जगताप, ऍड.शिवाजी कांबळे, बबनराव लोमटे, अमर देशमुख, शहेबाज म.फारूख मणियार, विशाल विजयकुमारजी जाजू, ऍड.इस्माईल गवळी, डॉ.राजेश इंगोले, शेख जिलानी महेबुब, दिनेश भराडीया, भिमसेन लोमटे, सय्यद ताहेर अब्दुल गफ्फार, सुनिल वाघाळकर, विशाल पोटभरे, दत्ताभाऊ सरवदे, सचिन जाधव, सुगत सरवदे, आकाश कराड, हमीद चौधरी, राजपाल जावळे, अंकुश हेडे, सरवदे सर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

=======================
नोट – बातमी सोबत फोटो.


Categories

Recent Posts