Breaking
Updated: डिसेंबर 6, 2025
टिप्परच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – एक भरधाव टिप्परने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना केज – धारूर रस्त्यावर तांबवा शिवारात घडली.
जालना जिल्ह्यातील ब्राह्मवाडी (ता. परतूर) येथील विलास दुबाजी खुराडे (वय ३२) हे गुरुवारी (दि. ४) रात्री साडे आठ वाजता आपल्या दुचाकीवरून कळंब येथील आपल्या साडूच्या भेटीला निघाले होते. केज – धारूर रस्त्यावरील तांबवा शिवारात विठ्ठलवाडीजवळ भरधाव टिप्परच्या (एम एच ४४ – यु २७१४) चालकाने निष्काळजीपणे टिप्पर चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विलास दुबाजी खुराडे यांचा जागीच मृत्यू झाला.