Breaking
Updated: डिसेंबर 1, 2025
केज - कळंब रस्त्यावरील घटना ; वाहनांच्या रांगा लागल्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – कळंब रस्त्यावरील घटना ; वाहनांच्या रांगा लागल्या
केज – पुलावर पुलावरच्या जम्पिंगमुळे टायर फुटल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त सोयाबीन भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावर साळेगावजवळ रविवारी (दि. ३०) रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. तर ट्रक पलटल्यामुळे वाहतूक खोळंबल्याने ऐन लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अंबाजोगाई येथून क्षमते पेक्षा जास्त सोयाबीन भरून ट्रक (एम एच ४४ यू १५४६) हा धाराशीवकडे निघाला होता. केजमार्गे कळंबकडे जात असताना रविवारी सकाळी १०.४५ वाजेच्या ट्रक हा या रस्त्यावरील साळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या पुलावर आला असता पुलावरील जम्पिंगमुळे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रकचे हाऊजिंग तुटून पुलावर ट्रक पलटी झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून ट्रक चालक संजय जाधव (रा. बोरीसावरगाव ता. केज) हे कीरकोळ जखमी झाले.
या अपघातामुळे ऐन पुलाच्या मध्यभागी ट्रक पलटी झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. त्यात रविवारी लग्नाची तिथी असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. दोन तासापेक्षा जास्त वेळ रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने खोळंबल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक फौजदार कादरी, जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलीस नाईक शिवाजी कागदे, पोलीस नाईक संतोष गित्ते यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी पोकलेनच्या मदतीने ट्रक रस्त्यावरून हटवून रस्ता खुला करीत वाहतूक सुरळीत केली.