Breaking
Updated: नोव्हेंबर 29, 2025
फडणवीस, पवारांनी धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे - मनोज जरांगे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपीची धनंजय मुंडेंना आठवण येते, केवळ मतांसाठी ते भर सभेत आरोपीची आठवण काढतात. याचा अर्थ धनंजय मुंडे आणि आरोपी एकच आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मुंडेंना सहआरोपी केले पाहिजे. धनंजय मुंडेंना सहआरोपी करीत अटक केली. तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल नसता फडणवीस हेच आरोपी सोडून देत आहेत असा त्याचा अर्थ होईल. असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येला शनिवारी तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मनोज जरांगे यांनी देशमुख यांना आदरांजली वाहिली. यावेळी माध्यमांशी मनोज जरांगे पाटील हे बोलत होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अजित पवार यांचा पक्ष चांगला आहे पण हा नासका माणूस सांभाळून ते पक्षाच्या इमेजला डाग लावून घेत आहे. अजित पवारांच्या पक्षात ओबीसीचे चांगले दुसरे नेते नाहीत का? त्यांनी दुसरे नेते सांभाळले पाहिजे. त्यांना मोठे केले तर तुमचा पक्ष मोठा होईल हे नासका सांभाळायची गरज नाही, याला आम्हीच सरळ करतो.