Breaking
Updated: नोव्हेंबर 28, 2025
नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशुक्रवार, दि.२८ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक १४ मधील सर्व मतदारांना सहकार्य करण्याची व मतदानरूपी आशिर्वाद देण्याची साद राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकारी उमेदवारांनी घातली. याप्रसंगी राजकिशोर मोदी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवार सौ.ज्योती विशाल पोटभरे व नजीर (मुन्ना) पठाण यांच्यासह शहराध्यक्ष मुख्तार शेख, शहर उपाध्यक्ष रशीद सय्यद, भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, विशाल पोटभरे, सय्यद अमजद व प्रभागातील अनेक युवा सहकारी सोबत होते. प्रभागातील या भेटीदरम्यान राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मतदारांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केल्या जात होते. त्याच बरोबर जागोजागी सुवासिनींकडून औक्षण देखील केल्या जात होते. यावरून राजकिशोर मोदी यांच्या प्रति मतदारांचा विश्वास, आपुलकी व प्रेम दिसून येत होते. अंबाजोगाई शहराचा मोदी कुटुंबियांवर विश्वास आहे. जनत सहकार्य व आशीर्वादाने राजकिशोर मोदी हे सातत्याने अंबाजोगाई नगरपरिषदेच्या माध्यमातून शहर वासीयांची सेवा करीत आहेत. मोदी हे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत आपला सक्रिय सहभाग घेऊन त्यातून त्यांनी युवकांची एक नवीन फळी तयार केली आहे. गणेशोत्सव काळात अंबाजोगाई शहरातील गणेश मंडळाच्या ढोल ताशा वाद्य स्पर्धा घेऊन अंबाजोगाईचे ढोल पथक साऱ्या महाराष्ट्रभर पोहचविले आहे. त्याचबरोबर नवरात्र उत्सवात दांडिया स्पर्धेची उत्कृष्ट अशी स्पर्धा आयोजित करून येथील महिला, युवक व युवतींना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून मोदी हे अंबाजोगाई शहरातील घराघरात पोहचले आहेत. अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान राजकिशोर मोदी हे त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या बळावरच यापुढेही मतदानरूपी आशिर्वाद मागत आहेत. अंबाजोगाई शहर हे एक कुटुंब म्हणून आपण काम केले असून येथील नागरिकांनी देखील भक्कम अशी साथ दिली आहे. यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकिशोर मोदी व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना पाठबळ देण्याचे आवाहन या प्रचारा दरम्यान राजकिशोर मोदी मतदारांना करीत आहेत. मतदार देखील खंबीरपणे मोदी कुटुंबाच्या पाठीशी राहण्याचे अभिवचन देतांना दिसून येत आहेत. शहरातील मतदार नवयुवक, महिला व जेष्ठ नागरिक यांच्याकडून मिळत असलेले प्रेम, आशीर्वाद पाहून मोदी व त्यांचे सहकारी भारावून जात आहेत. अंबाजोगाईतील प्रत्येक प्रभागात पापा मोदींच्या ‘कपबशी’ कडे जनतेचा ओढा दिसून येत आहे.