Breaking

केज पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकले

Updated: नोव्हेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

केज पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवासस्थाने हस्तांतरित करण्याची मागणी

केज – केज पंचायत समितीच्या सभापती, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थान इमारती धूळखात पडून आहेत. त्या इमारतीत विद्युत पुरवठ्याचे काम तात्काळ पूर्ण करून हस्तांतरित करण्यात याव्यात, या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीचे समन्वयक हनुमंत भोसले व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी मंगळवारी (दि. २५) दुपारी पं. स. कार्यालयाच्या मुख्य द्वारास कुलूप लावले.
केज येथील पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर समितीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या दोन मोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. तर त्याचठिकाणी सभापती व गटविकास अधिकाऱ्यांचे स्वंतत्र निवासस्थानाची इमारत बांधण्यात आलेली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इमारतीमध्ये विद्युतीकरण झालेले नसल्याने या इमारतीचे हस्तांतरण झालेले नाही. विजेची सोय नसल्याने या इमारती धूळखात पडून असून या इमारती दुर्लक्षित आहेत. त्यामूळे या इमारतीचा गैरवापर केला जात असून गुन्हेगारी वृत्तीचे व टवाळखोर मुले या इमारतीमध्ये बसून मद्यपान व धूम्रपान करीत आहेत. या इमारतीचा अवैध कामासाठी वापर होऊ लागल्याने या परिसरातील रहिवाशी नागरिकांना त्रास होत आहे. शिवाय इमारतीचे विद्रुपीकरण होत असून शासकीय निवासस्थानाची ताब्यात घेण्यापूर्वीच दुर्दशा होऊ लागली आहे. याची दखल घेऊन निवासस्थान इमारतीतील विद्युतचे काम तात्काळ करून इमारतीचे हस्तांतरण करण्यात यावे. अन्यथा २५ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकू असा इशारा केज विकास संघर्ष समितीचे समन्वयक हनुमंत भोसले यांनी दिला होता.
दरम्यान, त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने मंगळवारी दुपारी हनुमंत भोसले व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारास कुलूप लावले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार बाळासाहेब रोडे, कार्यालयीन अधीक्षक जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलीस नाईक बळीराम म्हेत्रे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मध्यस्थी केली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.


Categories

Recent Posts