Breaking
Updated: नोव्हेंबर 21, 2025
शिक्षकाची दुचाकी लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज शहरातील वसंत महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश दत्तू जाधव हे गणेश नगर भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता दुचाकी (एम. एच. ४४ डब्ल्यू ५०७६) घरासमोर लावली होती. अज्ञात चोरट्याने रात्रीतून त्यांची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांच्या तक्रारीवरून केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.