Breaking
Updated: नोव्हेंबर 19, 2025
आरोपी लोणावळ्यातून जेरबंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : शहरातील तक्रारदाराला स्वस्तात विमानतिकिटे काढून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बीड शहर डीबी पथकाने लोणावळ्यातून अटक केली. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
तक्रारदार अण्णासाहेब गोटीराम राठोड यांचा मुलगा विदेशात शिक्षण घेत असून, त्याच्या येण्या-जाण्यासाठी स्वस्तात विमानतिकिटे मिळवून देतो अशी खात्री आरोपीने तक्रारदाराला दिली होती. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने २५ लाखांची रक्कम घेतली आणि नंतर फरार झाला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा माग काढणे कठीण जात होते. मात्र बीड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती व सततच्या प्रयत्नांच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधला आणि लोणावळ्यातून अटक करण्यात यश मिळवले.
कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, गहिनाथ बावनकर व राम पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीसांचे आवाहन
नागरिकांनी स्वस्त विमानतिकिटे, परदेशात नोकरी, किंवा मोठा माल स्वस्तात देण्याच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. मोठी आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यवहाराची खात्री करावी आणि फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.