Breaking
Updated: नोव्हेंबर 14, 2025
मुख्यमंत्र्यांना दिले पत्र,९०० जणावरे लंपीने बाधीत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुख्यमंत्र्यांना दिले पत्र,९०० जणावरे लंपीने बाधीत
बीड: बीड जिल्ह्यात विविध भागात ९०० जणावरांना लंपी त्वचारोग बाधा झालेली आहे. यात ५८ जणावरांनाचा मृत्यू देखील झाला असून पशुपालक चिंतेत आहेत. या गंभीर स्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जिल्ह्यात शेकडो जनावरांना बाधा झाली आहे. आतापर्यंत ९०० जनावरे बाधित झाली असून ५८ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, ६३४ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. दरम्यान, ३,४१,१३५ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या आजारामुळे शेतकरी वर्गावर मोठा आर्थिक परिणाम झाला असून, दूध उत्पादनात घट झाली आहे. अनेक ठिकाणी दुधाचे सेवन टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याने दुग्धव्यवसायिकांनाही फटका बसत आहे. या पार्श्वभुमीवर, बाधित भागात पशुवैद्यकीय पथके वाढवून उपचार तातडीने सुरू ठेवावेत, लसीकरण मोहिमेला गती देऊन शंभर टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण करावे, बाधित व मृत जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई मंजूर करावी, जिल्ह्यातील पशुधन बाजार, दुग्धसंघ व डेअरी केंद्रांसाठी तात्पुरती मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत, तसेच जिल्हा प्रशासनास आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. आपल्या हस्तक्षेपामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वासही खा.बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
—
शेतकरीपुत्राचे चौफेर लक्ष
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लंपीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जनावरांचे मृत्यू देखील झालेले आहेत. शिवाय पशुपालकांचा मोठा खर्चही होत आहे. अशावेळी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. अशावेळी केवळ खा.बजरंग सोनवणे यांनी या विषयात लक्ष घालून आपले चौफेर लक्ष असल्याचे दाखवून दिले आहे.