Breaking

डुकडेगावात घरफोडी; साडेसहा तोळे सोने आणि ३० हजार रोख रक्कम चोरी

Updated: ऑक्टोबर 15, 2025

By Vivek Sindhu

डुकडेगावात घरफोडी; साडेसहा तोळे सोने आणि ३० हजार रोख रक्कम चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी : तालुक्यातील डुकडेगाव येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून साडेसहा तोळे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी श्रीराम पांडुरंग बडे (रा. डुकडेगाव ता. वडवणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता ते दि. १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी फिर्यादी आपली मुलगी प्रसूतीसाठी सरकारी दवाखाना, अंबाजोगाई येथे घेऊन गेले होते.

या काळात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि धान्याच्या कोठीत ठेवलेले सोन्याचे गठण, मिनीगठण, बोरमाळ, झुंबर, दोन अंगठ्या आणि ठुशी असे एकूण ४ तोळे ७५ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये) तसेच ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस हवालदार ग्रेडपोउनि तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Categories

Recent Posts