Breaking

अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील जिल्ह्यातील 108 उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरण

Updated: ऑक्टोबर 4, 2025

By Vivek Sindhu

108 उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा तत्वावरील गट-क संवर्गातील उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेतून निवड झालेले लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांना आज नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आली.

              येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  एम.एस.साळवे, जिल्हा कोषागार अधिकारी लहू गळगुंडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम रवी तोंडे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कृष्णा शिंदे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  प्रविण उखळीकर  यांची प्रमुख उपस्थिती होती.

          शासकीय सेवेत असतांना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पंरतू, तांत्रिक कारणे किंवा काही प्रशासकीय कारणास्तव या नियुक्त्या रखडलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागत होती. अशा या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून नवीन अनुकंपा धोरण तयार केले. त्याचाच परिणाम म्हणून आज अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अनुकंपा उमेदवारांना एकाच वेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली.

          तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक श्रेणीतील उमेदवारांना देखील नियुक्तीपत्रे देण्यात आली.

          आज आयोजित या मेळाव्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत आणि अपर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेतून निवड झालेले लिपिक-टंकलेखक संवर्गातील 64 उमेदवार तसेच अनुकंपा तत्वावरील गट-क संवर्गातील 36 आणि गट-ड संवर्गातील 08 उमेदवार अशा एकूण 108 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.

        जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास संबंधित उमेदवार व विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

                                               


Categories

Recent Posts