Breaking
Updated: ऑक्टोबर 3, 2025
कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार ; कार चालकावर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – कार चालकाने राँगसाईडने कार नेऊन समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचारासाठी घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. हा अपघात केज – साबला रस्त्यावरील कानडी माळी गावाजवळ झाला.
धर्माळा (ता. केज) येथील हनुमंत गणपत टेळे (वय ३३) हे १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता कामानिमित्त दुचाकीवरून (एम.एच. ४४ एसी ५४६४) केजला निघाले होते. केज ते साबला जाणाऱ्या रस्त्यावर कानडीमाळी येथील शेतकरी खंडु बळीराम राऊत यांच्या शेताजवळ समोरून आलेल्या कारच्या (एम. एच. ०४ बीसी १०१०) चालकाने कार ही भरधाव वेगात हायगाई व निष्काजीपणाने चालवून राँगसाईडने कार नेत समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात हनुमंत टेळे यांच्या डोक्याला, तोंडाला, हात-पायावर मार लागून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या रुग्णलयात पाठविण्यात आले. मात्र वाटेत त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. २ ऑक्टोबर रोजी दैवशाला हनुमंत टेळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कारच्या चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.