Breaking

विविध जिल्ह्यात दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; ६ दुचाकी जप्त

Updated: सप्टेंबर 30, 2025

By Vivek Sindhu

विविध जिल्ह्यात दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; ६ दुचाकी जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत विविध ठिकाणी दुचाकी चोरी करणारा चोरटा जेरबंद केला आहे. त्याच्याकडून तब्बल ६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून एकूण पाच चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अंकुश कात्रे (वय ४५, रा. म्हसोबाची वाडी, ता. वाशी) याने खंडेश्वरी देवी यात्रेतील पार्किंगमधून युनिकॉर्न दुचाकी चोरून सम्राट बिअर बार समोर वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला २९ सप्टेंबर रोजी मिळाली. पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला पकडले. चौकशीदरम्यान त्याने केवळ खंडेश्वरी देवी येथील नव्हे तर इतरही दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीवरून पांगरी रोड, बीड येथे लपवून ठेवलेल्या आणखी पाच दुचाक्या जप्त करण्यात आल्या.

पोलिस तपासात कात्रे याने लातूर, बार्शी, सोलापुर, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे येथून दुचाक्या चोरल्याचे उघड झाले. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत. एकूण ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ६ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणी गुन्हे पेठ पोलीस ठाण्यात नोंद असून तपास पोलीस हवालदार इंगोले करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने एकाच आरोपीकडून पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणत मोठे यश मिळवले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या नेतृत्वात हवालदार विकास राठोड, आनंद मस्के, राहुल शर्शीद, अंकुश वरपे, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे व चालक नितीन वडमारे यांच्या पथकाने केली.

पोलीसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.


Categories

Recent Posts