Breaking

अक्षय मुंदडा यांनी मांजरा नदी काठच्या गावांना दिल्या भेटी

Updated: सप्टेंबर 24, 2025

By Vivek Sindhu

नुकसानीची पाहणी करीत पंचनाम्याच्या दिल्या सूचना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नुकसानीची पाहणी करीत पंचनाम्याच्या दिल्या सूचना

केज – अतिवृष्टीने मांजरा नदीला पूर आल्याने नदी काठच्या गावात पूराचे पाणी शिरले असून जमिनी पिकांसह वाहून गेल्या आहेत. आ. नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांनी मंगळवारी अतिवृष्टी बाधित गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. प्रशासनास तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या.
अतिवृष्टीने मांजरा नदीला पूर आल्याने नदीपात्रातून पुराचे पाणी नदी काठच्या केज तालुक्यातील बोरगाव, भोपला, पिट्टीघाट, दैठणा, नाव्होली, राजेगाव आणि हादगाव या गावात शिरले आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून या गावातील नदी काठच्या जमिनी पिकांसह वाहून गेल्या असून सोयाबीन पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर राहत्या घरासह गोठे, पशुधन व जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती व भाजपचे नेते अक्षय मुंदडा यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या व मांजरा नदी काठच्या बोरगाव, भोपला, पिट्टीघाट, दैठणा, नाव्होली, राजेगाव, हादगाव या गावांना भेटी दिल्या. सोयाबीन पिकांच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना ही अक्षय मुंदडा यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार राकेश गिड्डे, भाजपचे जिल्हा सचिव सुनील गलांडे, माजी उपसभापती नेताजी शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

नंदकिशोर मुंदडा यांची इस्थळला भेट

सध्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असून धरणाच्या खालच्या व मांजरा नदी काठावर असलेल्या इस्थळ (ता. केज) येथे जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देऊन पुराच्या पाण्यापासून काळजी घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.


Categories

Recent Posts