Breaking

लक्ष्मण हाकेंचा विश्वासू पवन कंवरवर प्राणघातक हल्ला

Updated: सप्टेंबर 24, 2025

By Vivek Sindhu

InShot 20250924 091539839

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय व विश्वासू सहकारी पवन कंवर यांच्यावर बीड जिल्ह्यात प्राणघातक हल्ला झाला. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सावरगावजवळ धाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या पवन कंवर व त्यांच्या तीन साथीदारांवर तब्बल 40 ते 50 अज्ञात युवकांनी लाठ्या, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला.

या मारहाणीत पवन कंवर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती आहे. त्यांच्या तीन साथीदारांनाही मार लागला असून सर्वांना उपचारासाठी माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग लावल्याच्या घटनेनंतर काही तासांतच हा हल्ला घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालक कोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. हल्ल्यानंतर सर्व अज्ञात आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.


Categories

Recent Posts