Breaking

पिंपळनेरमध्ये लघुउद्योग बंद करण्यासाठी व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Updated: सप्टेंबर 24, 2025

By Vivek Sindhu

डोळ्यात चटणी टाकून महिलेचा विनयभंग ; पीडितेसह नातेवाईकांना मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पिंपळनेर (जि. बीड) : गावातील दुकानात झोपलेल्या व्यापाऱ्यावर अज्ञात आरोपींनी लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना १९ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे १.३० ते २.०० वाजताच्या सुमारास घडली.

फिर्यादी शांता कमलाकर काटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती सखाराम विठ्ठल काटे हे आपल्या लघुउद्योगाच्या (मुरकूल, शेंगदाणे, फुटाणे विक्री) दुकानात झोपलेले असताना आरोपींनी संगनमत करून दुकानाचे शटर बाहेरून उघडले.

त्यानंतर हातातील लोखंडी गजाने डोक्यात, डोळ्यांवर आणि तोंडावर मारहाण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी “तुझा लघुउद्योग व्यवसाय बंद का करत नाहीस?” असे म्हणत हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात सखाराम काटे गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी गु.र.नं. २७२/२०२५ अंतर्गत कलम १०९, ३३३, ३५१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गर्जे करीत आहेत.


Categories

Recent Posts