Breaking

बीडमध्ये स्टेशनरी दुकान फोडून १७ हजार रुपयांची चोरी

Updated: सप्टेंबर 23, 2025

By Vivek Sindhu

एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहरातील रविंद्र स्टेशनरी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे १६ ते १७ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०२ वाजता समोर आला.

फिर्यादी विष्णु शंकर ढवळे (वय ५९, रा. उमरज जहागीर, ता. बीड) रविंद्र सोनाजीराव क्षीरसागर यांच्या मालकीच्या रविंद्र स्टेशनरी दुकानात काम करतात. ते २१ सप्टेंबर रोजी दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आल्यावर कुलूप तोडलेले, शटरच्या पट्ट्या फोडलेल्या अवस्थेत दिसल्या. आत पाहता गल्ला उघडलेला असून त्यातील १६ ते १७ हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधिकारी सानप करीत आहेत.


Categories

Recent Posts