Breaking
Updated: सप्टेंबर 23, 2025
बीड तालूक्यातील नांदूर हवेलीतील पूरग्रस्त भागाची
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी
बीड – बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आला आहे. या नदीचे पाणी बऱ्याच भागांमध्ये घुसले असून, बीड तालूक्यातील नांदूर हवेली गावात देखील नदीचे पाणी घुसल्याने अनेक नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी आज बीड तालूक्यातील नांदूर हवेली येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी श्री. महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधुन, त्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आश्वासित केले. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, परंतू शासनामार्फत पूर्वग्रस्त भागातील बाधीत नागरिक आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसिलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह नांदूर हवेली येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.