बीड – बीड तालुक्यातील पाली येथे असलेला बिंदुसरा धरण प्रकल्प मान्सुनपूर्व पावसानेच 100 टक्के क्षमतेने भरला असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.30) रोजी बिंदुसरा धरणात जलपूजन करण्यात आले. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या मान्सूनपूर्व पावसाने बीड शहराला लागून असलेल्या पाली येथील बिंदुसरा धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी ओसंडून वाहत आहे.