Breaking
Updated: सप्टेंबर 15, 2025
रेल्वे उद्घाटन सोहळा : नागरिकांनी खासगी वाहन कार्यक्रमस्थळी आणू नये; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंगळवार, 16 सप्टेंबर 2025 रोजी बीड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी नद्या धोका पातळी ओलांडून वाहत असून जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित संस्था, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयटीआय यांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे आयोजन होणार असल्याने त्याची पूर्वतयारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केली जाणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले असून त्यांना या सुट्टीतून वगळण्यात आले आहे.