Breaking

प्रा. लक्ष्मण हाकेंवर परळी व अंबाजोगाईत गुन्हे दाखल

Updated: सप्टेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

प्रा. लक्ष्मण हाकेंवर परळी व अंबाजोगाईत गुन्हे दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी/अंबाजोगाई : गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी येथे दि. 13 सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी अधिवेशनात करण्यात आलेल्या जाती आधारित वादग्रस्त विधानांमुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात परळी आणि अंबाजोगाई पोलिस ठाण्यांत स्वतंत्र तक्रारी दाखल होऊन दोन्हीकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात लक्ष्मण हाके (रा. जुजारपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) व नवनाथ वाघमारे (रा. जालना) या दोघांनी मराठा समाजाचा अपमान करणारी विधाने केली, असा आरोप करण्यात आला होता. परळी पोलिसांनी देवराव लुगडे यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, हाके यांनी आपल्या भाषणात मराठा समाज ओबीसी समाजात आला असून “आता पहिले 11 विवाह आपल्या आपल्यात ठरवूया, तुम्ही आमच्यात आलात तर जातपात उरली का, पाटील 96 कुळी, क्षत्रिय राहिलात का?” असे वक्तव्य केले. तर वाघमारे यांनी “मराठवाड्यातील मराठा समाज हा निजामाची औलाद असून या निजामाच्या औलादीला आरक्षणामध्ये घेऊ नका” असे विधान करून मराठा समाजाचा मानहानीकारक अपमान केला.

दरम्यान, या अधिवेशनातील विधानांबाबत अंबाजोगाईतही गुन्हा दाखल झाला आहे. ॲड. पृथ्वीराज बाजीराव कदम (रा. मुकुंदराज कॉलनी, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाचा अपमान करणारे विधान केले. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसी समाजात सामील झाला आहात, आता विवाह एकमेकांत करू या, मराठा समाजातील महिलांचा उल्लेख करत अपमानास्पद भाषा वापरली, अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केले, अशी तक्रारीत नोंद आहे. या तक्रारीवरून अंबाजोगाई पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत आहेत

दोन्हीकडे दाखल गुन्ह्यांचा तपास अनुक्रमे परळी पोलीस व अंबाजोगाई पोलीस करत असून पुढील चौकशी सुरू आहे.


Categories

Recent Posts