Breaking

ट्रॅक्टरच्या टायरवरून वाद, शेतकऱ्यावर लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला

Updated: सप्टेंबर 12, 2025

By Vivek Sindhu

डोळ्यात चटणी टाकून महिलेचा विनयभंग ; पीडितेसह नातेवाईकांना मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अमळनेर – हातोला येथे ट्रॅक्टरच्या टायरवरून वाद काढत तीन जणांनी संगनमत करून शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. या प्रकरणी संतोष विठ्ठल कुत्तरवाडे (वय ४२, रा. हातोला, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिल्यानंतर अमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटना ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. फिर्यादी संतोष कुत्तरवाडे यांना समहारी देवराव कुत्तरवाडे, दादासाहेब देवराव कुत्तरवाडे आणि आजित रामहारी कुत्तरवाडे (सर्व रा. हातोला) यांनी “आमच्या उकांवरून ट्रॅक्टरचे टायर का घातले” असा वाद काढत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी क्रमांक १ समहारी कुत्तरवाडे याने भरेव बांबूच्या काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर व लोखंडी रॉडने डाव्या गुडघ्यावर वार करून गंभीर जखमी केले. आरोपी क्रमांक २ दादासाहेब कुत्तरवाडे याने बांबूच्या काठीने डाव्या हातावर मारून जखमी केले. आरोपी क्रमांक ३ आजित कुत्तरवाडे याने फिर्यादीच्या उजव्या पायावर काठीने वार करून मुलगा आशोक कुत्तरवाडे यांच्या पाठीवर काठीने मारहाण केली.

हल्ल्यानंतर आरोपींनी “आमच्या नादी लागलात तर जिवे मारून टाकू” अशी धमकी दिली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांचा मुलगाही किरकोळ जखमी झाला आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफौ शिंदे पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts