Breaking

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाहनांवर कारवाई, पाच लाखांचा दंड वसूल

Updated: सप्टेंबर 11, 2025

By Vivek Sindhu

सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड दि. 10 : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी बीड पोलीस दलाने घेतलेल्या विशेष मोहिमेत शहरातील 15 डीजे वाहने जप्त करण्यात आली. जप्त वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई करत तब्बल 5 लाख 4 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बीड पोलीस दलाकडून पेठबीड, शिवाजीनगर आणि बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत कडक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान प्रचंड आवाजात डीजे वाद्ये वाजवून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले.

एकूण 15 डीजे वाहने जप्त करून त्यांचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार या कारवाईतून एकूण 5 लाख 4 हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आली. आगामी काळातही ध्वनीप्रदूषणाविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी कायद्याचे पालन करून उत्सव शांततेत व आनंदात साजरे करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Categories

Recent Posts