Breaking
Updated: सप्टेंबर 5, 2025
बळजबरीने वर्गणी केल्यास कठोर कारवाई - बीड पोलिसांचा इशारा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने वर्गणी उकळल्याच्या तक्रारी पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. बळजबरीने वर्गणी घेणे हा गुन्हा असून त्यावर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा बीड पोलिसांनी दिला आहे.
सार्वजनिक उत्सवांसाठी नागरिक व व्यापाऱ्यांकडून देणगी अथवा वर्गणी घेण्याची परंपरा असली तरी ती स्वखुषीने दिली गेली पाहिजे. बळजबरीने वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळे किंवा समित्यांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागरिक किंवा व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारची सक्ती झाल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सण-उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावेत यासाठी पोलिसांकडून विशेष देखरेख ठेवली जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात कुणीही बळजबरीने वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करून अटकसुद्धा केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.