Breaking
Updated: सप्टेंबर 4, 2025
बनावट रेशनकार्ड दाखवून चक्क पोलिसांचीच दिशाभूल; गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : शहरातील बसस्थानक परिसरात परळी-पुणे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या खिशातून तब्बल 43 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पनालाल झुंबरलाल बोरा (वय 54, रा. प्रियंका कॉलनी, पुणे रोड, अहिल्यानगर) यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पनालाल बोरा हे खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते घरकामासाठी बीड येथील आपल्या मेहुण्याकडून उसणे पैसे घेण्यासाठी आले होते. त्यांनी सकाळी 10 वाजता बीड येथे पोहोचून मेहुणे सिद्धार्थ विजय मंडलेचा, रा. फुलाईनगर, यांच्याकडून 43 हजार रुपये घेतले. त्यानंतर दुपारी परत अहिल्यानगरला जाण्यासाठी बसस्थानकात आले.
दुपारी दोन वाजता परळी ते पुणे या बसमध्ये (क्र. MH14 0570) चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या डाव्या खिशातून 500 रुपयांच्या 86 नोटा, एकूण 43 हजार रुपये, चोरले. घटनेनंतर त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बीड शहर पोलीस करत आहेत.