अंबाजोगाई : आज गुरुवार, दिनांक २९ मे रोजी सकाळच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एक दुर्दैवी अपघात घडला. एमएच १४ एमएच १७०१ या क्रमांकाच्या एस.टी. बसच्या खाली येऊन एक तरुण चिरडला गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.