Breaking

एचडीएफसी बँकेत बनावट नोटा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाविरुद्ध गुन्हा

Updated: ऑगस्ट 31, 2025

By Vivek Sindhu

Fake Currency

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहरातील बाजीराव कॉम्प्लेक्स येथील एचडीएफसी बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरूणाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एचडीएफसी बँकेतील कॅशिअर नकुल महादेव घुंगरड (रा. स्वराज्यानगर, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता आरोपी वैभव सोपान आगम (रा. पिंपरगव्हान, ता. बीड) हा बँकेत आला.त्याने स्वतःच्या ताब्यातील बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून कॅश डिपॉझिट मशीनमध्ये टाकल्या. या प्रक्रियेदरम्यान काही नोटा मशीनमधून बाहेर आल्या. आरोपी त्या नोटा खऱ्या नोटांसह घेऊन जात असल्याचे बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले. बँक अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता पाचशे रुपयांच्या एकूण सात बनावट नोटा मिळाल्या. 

या प्रकरणी आरोपी वैभव सोपान आगम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर करत आहेत.


Categories

Recent Posts