मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या दरम्यान आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथील मराठा कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात झाला.
हा अपघात मुंबईतील चेंबूर ब्रिजवर झाला असून यात तीन मराठा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अचानक झालेल्या या घटनेमुळे आंदोलकांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र आंदोलकांचा मोर्चा नियोजितप्रमाणे आझाद मैदानाकडे सुरू आहे.
मनोज जरांगे यांनी जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस केली असून आंदोलन आणखी जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.