अंबाजोगाई -: येथील वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि., अंबाजोगाईच्या अध्यक्षा श्रीमती. सुनंदा परशुरामजी मुंदडा यांची बीड जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या स्विकृत संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशन्सचे अध्यक्ष स.छ. लोहिया यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
बीड येथे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., बीडच्या कार्यकारी मंडळ बैठकीत झालेल्या निर्णया नुसार, सुनंदा मुंदडा यांची बीड जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., बीडच्या "स्विकृत संचालक" पदी नियुक्ती करण्यात आली.
सुनंदा मुंदडा यांचे सहकार क्षेत्रातील कार्य व अनुभवाचे बीड जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनच्या प्रगतीस मोलाचे योगदान लाभलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली. सुनंदा मुंदडा यांनी सहकार क्षेत्रात काम करत असताना आपल्या स्वकर्तृत्वाने आर्थिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.
त्यांच्या या झालेल्या नियुक्ती बद्दल आ.नमिता अक्षय मुंदडा, जेष्ठनेते नंदकिशोर मुंदडा, वसुंधरा बँकेचे तज्ञ संचाालक ॲड.आर.डी.कदम, पुरुषोत्तम भन्साळी,यांच्या सह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.