केज- केज शिवारात असलेल्या राजीव गांधी पाझर तलावातील जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मावेजा मिळेपर्यंत मुरूम उत्खनन व सुशोभीकरण करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
केज शिवारात सन १९८२ साली राजीव गांधी पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना मिळालेला नसून तलावाचा बांध जीर्ण झाला असून पाणी वाहून जात आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे बांध फुटण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बांध दुरुस्तीचे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. सध्या तलावाचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली मुरूम उत्खनन करण्याचे काम हाती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला आहे. अगोदर शेतकऱ्यांना मावेजा देण्यात यावा, तोपर्यंत मुरूम उत्खनन व सुशोभीकरण करू नये, बांध दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशी शंकर घुले, महादेव घुले, अच्युतराव घुले, आण्णा घुले, यशवंत घुले, जयवंत घुले, गणपत घुले, विष्णू बाबासाहेब घुले, भगवान घुले, श्रीराम घुले, नारायण घुले, केशव घुले, अनंत घुले, नानाभाऊ घुले, रामकृष्ण लक्ष्मण घुले, शिवाजी घुले, दशरथ घुले, गोरख घुले, गणेश घुले यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.