डॉ. नरेंद्र काळे यांचे खासदार बजरंग सोनवणे यांना निवेदन
अंबाजोगाई : जिल्ह्यात अद्याप केंद्रीय विद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा मिळण्यात अडथळे येत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची मागणी डॉ. नरेंद्र काळे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रीय विद्यालय संगठन, नवी दिल्ली यांच्याकडून यापूर्वीच जिल्हाधिकारी बीड यांच्याशी पत्रव्यवहार झाल्याची माहिती डॉ. काळे यांनी दिली. विद्यालय स्थापनेसाठी आवश्यक असलेली जमीन अंबाजोगाई येथे उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे अंबाजोगाईत केंद्रीय विद्यालय स्थापन व्हावे यासाठी आपण पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी खासदार सोनवणे यांच्याकडे केली.
या वेळी डॉ. काळे यांच्यासोबत मा. राजेसाहेब देशमुख, शंकर जाधव, रणजीत मोरे आदी उपस्थित होते.