Breaking
Updated: ऑगस्ट 11, 2025
एकलव्य जयंती मिरवणुकीत पिस्तूल दाखवत दहशत; तिघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी : मौजे शिराळ (ता. आष्टी) येथील भिल्ल वस्तीमध्ये काढण्यात आलेल्या एकलव्य जयंती मिरवणुकीत विनापरवाना पिस्तूल हातात धरून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश उर्फ तात्यासाहेब तुकाराम गांगुर्डे (रा. पारगाव, ता. पाटोदा) यांनी एकलव्य जयंती मिरवणुकीदरम्यान विनापरवाना पिस्तूल हातात घेतले होते. यामुळे मिरवणुकीत सहभागी तसेच परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात त्याच्यासह राजू पाडुरंग पवार आणि विकास भाऊसाहेब बर्डे (दोघे रा. शिराळ, ता. आष्टी) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी सद्दाम सत्तार शेख यांच्या फिर्यादीवरून कलम २२३, तसेच कलम ३/२५ भारतीय शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवाडे करत आहेत.