अंबाजोगाई (प्रतिनिधी) – कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण सोमवार, दिनांक २६ मे रोजी केज तालुक्यातील उंदरी येथे करण्यात आले. या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आणि पूर्वसंध्येला ‘खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम’ ही आयोजित करण्यात आला होता.