Breaking

जाणून घ्या युपीआय व्यवहारात झालेले महत्त्वाचे बदल; दररोजच्या व्यवहारांवर मर्यादा लागू

Updated: August 3, 2025

By Vivek Sindhu

AA1JHcDC

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नवी दिल्ली – युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांचा वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच सिस्टमवरील ताण कमी करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने १ ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. विशेषत: दिवसातील गर्दीच्या तासांमध्ये वापरकर्त्यांना अधिक सुलभता मिळावी, यासाठी हे बदल केले गेले आहेत. PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या ॲप्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांनी या नव्या नियमांची माहिती घेणे गरजेचे आहे.

बॅलन्स चेकवर मर्यादा

यापुढे कोणताही वापरकर्ता एका दिवसात केवळ ५० वेळा आपल्या बँक खात्याचा शिल्लक रक्कम (बॅलन्स) पाहू शकतो. ही मर्यादा वापरकर्त्याने थेट केलेल्या विनंत्यांवरच लागू होईल. तसेच UPI ॲप्सना पार्श्वभूमीत (background) आपोआप बॅलन्स चेक करता येणार नाही. ग्राहकाने एखाद्याला पैसे पाठविल्यानंतर त्वरित त्याचा अद्ययावत बॅलन्स स्क्रीनवर दर्शविण्यात येईल, त्यामुळे वारंवार बॅलन्स तपासण्याची गरज भासणार नाही.

बँक खात्यांच्या तपशीलांवर मर्यादा

मोबाईल नंबरशी संलग्न बँक खाती पाहण्यासाठी युजर्सना दररोज केवळ २५ वेळाच संधी मिळणार आहे. एखादा वापरकर्ता ॲपमध्ये नवीन बँक निवडतो तेव्हाच ही सुविधा वापरता येणार आहे.

ऑटो-पेमेंट व्यवहार ‘नॉन-पिक अवर’मध्येच

OTT सबस्क्रिप्शन किंवा ईएमआय यांसारख्या सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑटो-पेमेंट व्यवहारांना आता सकाळी १० वाजेपर्यंत किंवा रात्री ९.३० नंतरच परवानगी असेल. गर्दीच्या वेळात NPCI सिस्टमवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून ही अंमलबजावणी करण्यात आली आहे.

फेल झालेल्या ऑटो-डेबिट व्यवहारांसाठी मर्यादित संधी

UPI ऑटो-डेबिट सेवा आता एखादा व्यवहार पूर्ण होण्यासाठी केवळ एक मुख्य प्रयत्न व त्यानंतर तीन वेळा पुन्हा प्रयत्न करण्याचीच मुभा देईल. यामुळे सतत फेल होणाऱ्या व्यवहारांमुळे नेटवर्कवर येणारा भार कमी केला जाणार आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

NPCI ने सर्व बँका व पेमेंट सेवा पुरवठादारांना ३१ जुलैपर्यंत या नियमांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या ॲप्स किंवा बँकांवर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Recent Posts

पावसात मोबाईल भिजला? घाबरू नका, हे उपाय करतील मदत

पावसात मोबाईल भिजला? घाबरू नका, हे उपाय करतील मदत