Breaking

अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई

Updated: July 19, 2025

By Vivek Sindhu

हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर छापे, १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर छापे, १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

अंबाजोगाई : अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू विरोधात कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मौजे राडी तांडा येथे अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पथकांनी एकूण पाच आरोपींविरुद्ध हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकले. यावेळी १६०० लिटर हातभट्टी दारूचे रसायन, ९० लिटर तयार हातभट्टी दारू, बॅरल व दारूचे कॅन असा एकूण ८२,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या ठिकाणी सापडलेल्या रसायनाचे नमुने घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने ९ आरोपींविरुद्ध कारवाई करत ५४०० लिटर रसायन, ४५ लिटर तयार हातभट्टी दारू व साहित्य असा एकूण १,८९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने २ आरोपींविरुद्ध केलेल्या कारवाईत १५६० लिटर रसायन व साहित्य असा ६९,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत जागीच नष्ट केला.

या सर्व कारवायांमध्ये एकूण १६ आरोपींविरुद्ध सात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.