Breaking

जवळगाव शिवारातून एकाच रात्रीत सहा पाणबुडी मोटारी चोरीला

Updated: July 19, 2025

By Vivek Sindhu

जवळगाव शिवारातून एकाच रात्रीत सहा पाणबुडी मोटारी चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव शिवारात विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एकाच रात्रीत जवळगाव शिवारातील तब्बल सहा शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी अविनाश मधुकर साळुंके (वय २५) रा. जवळगाव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पावसामुळे ते वडिलांसोबत गावाकडे परतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता विहिरीतील पाणबुडी मोटार चोरीला गेल्याचे लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी शेजारील आपल्या चुलत भावांच्या व शेजारील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाहणी केली असता दिपक गोकुळ साळुंके, प्रकाश गोकुळ साळुंके, बालासाहेब यशवंत साळुंके, प्रभाकर किसन बनसोडे, राजपाल बापूसाहेब शिंदे यांच्या विहिरीतील मोटारीसुद्धा चोरीस गेलेल्या आढळल्या.

या सर्व पाणबुडी मोटारी व वायर मिळून एकूण ६९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या चोरीचा कालावधी १६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० ते १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यानचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सदर फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची गरज आहे. पोलीसांनी या चोरीचा तपास तातडीने करावा आणि चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Also Read

Recent Posts