धारूर : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, सर्पदंशामुळे एका कुटुंबातील सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना २४ मे रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली.