Breaking
Updated: July 11, 2025
WhatsApp Group
Join Nowशिरूर – तालुक्यातील खोकरमोह येथील शिवाजी बाबुराव मिसाळ (वय ४९) यांच्या घरातून ८ जुलै रोजी दिवसाढवळ्या २९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. घराला कुलूप न लावल्याने चोरट्याने ही संधी साधली.
८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता शिवाजी मिसाळ यांचा मुलगा शेतात गेला होता. त्याचवेळी त्यांच्या पत्नी आशा मिसाळ बीड येथील एका कार्यक्रमासाठी घाईघाईने घराला कुलूप न लावताच निघून गेल्या. शिवाजी मिसाळ हे पत्नीला बसमध्ये बसवून थेट शेतात कामासाठी गेले. सायंकाळी ५ वाजता शिवाजी मिसाळ घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहिले असता, कपाटातील २० हजार रुपये रोख, ५ ग्रॅम सोन्याचे झुंबर (किंमत २,००० रुपये) आणि ७,००० रुपये किमतीची पितळी व तांब्याची भांडी असा एकूण २९,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पत्नीने घराला कुलूप लावायला विसरल्याचे सांगितल्यावर चोरीचा उलगडा झाला. शेजारील लोकही शेतात कामासाठी गेलेले असल्याने कुणीही चोरट्याला पाहिले नाही. शिवाजी मिसाळ यांच्या फिर्यादीवरून शिरूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.