Breaking
Updated: July 9, 2025
WhatsApp Group
Join Nowतरुणाविरुद्ध पोस्कोचा गुन्हा
केज – एका शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली असून पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जात असतांना, ऋषिकेश उर्फ सचिन रामभाऊ गलांडे याने तिचा पाठलाग केला आणि ट्रॅक्टर घेवुन तिच्या पाठी मागुन जात तिला कट मारून पुढे गेला. तिच्या कडे पाहून हावभाव करून विनयभंग केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.
एक वर्षापासून मुलीला त्रास
ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे हा पीडित मुलगी ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत असल्या पासून तिचा पाठलाग करून स्कूल बॅग धरून ओढणे व तिच्या हाताला धरून ओढणे. कट मारून निघून जाणे. तसेच दहावीची परीक्षा देवू देणार नाही. या बाबत कोणाला सांगीतलेस तर तुला खल्लास करून टाकतो. अशी धमकी देत होता.
आईवडिलांना कल्पना देऊन ही त्रास थांबला नाही
पीडित मुलीने ऋषिकेश उर्फ सचिन याच्या पासून तिला होणाऱ्या त्रासाची कल्पना तिची आईला दिल्या वरून त्यांनी त्याच्या घरी जावुन त्याच्या आई-वडीलांना त्याला समजुन सांगणे बाब सांगीतले होते. तसेच पीडित मुलीने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पण या छेडछाडीचे कल्पना दिली. तरी तो तिला त्रास देत असे.